Sunday, September 02, 2007

जागा हो दु:ख निद्रेतून...

जागा हो दु:ख निद्रेतून...

अरे नको नको म्हणला कितीही तरी
चुकला नाही कोणा दु:खाचा डंख
पण वेड्या ज्याने दिली वेदना तो
विसरत नाही कधी देण्या उमेदीचा पंख

मान्य आहे जरी दिसतोय समोर
फक्त काळाभोर अंधार भकास
तरी विसरलास का, रात्रीनंतर दिवस
हा नियमच करतो जगाचा विकास

क्षणभर वाटेल तुला संपलं सगळं
जीवन दिसेल निस्तब्ध शांत मंद
पण ठाउक आहे का दोर असा तुला
जो जगरहाट करील क्षणातच बंद

आयुष्यातील भावानांच्या कल्लोळात
सुख दु:ख मानण्यात आहे सारे
स्वर्ग सुखाचे गातो बेधुन्द गाणे तो
डोईवर छप्पर ज्याच्या नभीचे अनंत तारे

रूक्ष उन्हात पडलेलं झुळुकीचं स्वप्न
देउन जाईल एक अनामिक भीती
गमावू नकोस ती आशा तेव्हा
कारण तीच देईल तुला चिरंतन गती

जागा हो दु:ख निद्रेतून आता
घेऊन त्या आशेची लहानशी ज्योत
अरे चालायचयं वेगात तुला पुढे
बनवित तिचा उज्ज्वल प्रकाशझोत
- Pallavi

1 comment:

Unknown said...

Hi, Really a nice poem with inspiring message ! It has turned my sorrows into strengths ! I was realy upset this morning, but now managing for work and meetings ! I am lucky to that i got this poem.
Thanks Hemant K. Cummins